अर्थ : कारण नसतांना बेसुमार खर्च करणे.
उदाहरणे :
वाईट लोकांच्या नादी लागून त्याने खूप पैसा उडवला.
समानार्थी : उडवणे, उधळणे, उधळपट्टी करणे, घालवणे, वायफळ खर्च करणे
अर्थ : जोरात आघात करून एखादी गोष्ट कापून टाकणे वा कापून वेगळी करणे.
उदाहरणे :
तलवारीने त्या दोघांचे मुंडके उडवले.
समानार्थी : उडवणे
अर्थ : खर्च करून टाकणे.
उदाहरणे :
एवढेच सामान! सगळे पैसे खर्च करून टाकलेस का?
त्याने सगळे पैसे उडवले.
समानार्थी : उडवणे, खर्च करून टाकणे
अर्थ : उडवण्याचे काम दुसर्याकडून करवून घेणे.
उदाहरणे :
शेतकर्याने धान्यावर बसलेल्या पक्षांना मुलांकडून उडवले.
समानार्थी : उडवणे
उडविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. udvine samanarthi shabd in Marathi.